Saturday, May 10, 2025

देशमहत्वाची बातमी

NDA Meeting: NDA खासदारांची आज बैठक, पंतप्रधान मोदींना निवडले जाणार नेता

NDA Meeting: NDA खासदारांची आज बैठक, पंतप्रधान मोदींना निवडले जाणार नेता

नवी दिल्ली: भाजपच्या नेतृत्वातील एनडीएची शुक्रवारी बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व खासदार सामील होणार आहेत जे औपचारिकपणे मोदींची नेता म्हणून निवड करतील. शपथविधी ९ जूनला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि यावेळेसही एनडीला बहुमत मिळा ले आहे. यावेळेस त्यांना २९३ जागांवर विजय मिळाला. दरम्यान, भाजपला मात्र बहुमत मिळवता आले नाही.


सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदी एनडीएचे संसदीय दलाचे नेते निवडल्यानंतर टीडीपी अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार हे वरिष्ठ सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. या दरम्यान राष्ट्रपतींना समर्थन देणाऱ्या खासदारांची यादी दिली जाईल. एनडीएकडे २९३ खासदार आहे जे ५४३ सदस्यांच्या लोकसभेत बहुमताच्या २७२ आकड्यापेक्षा अधिक आहेत.


केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी दिवसभर बैठकी घेतल्या. तसेच सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना गती देण्याबाबत विचार केला. ही बैठक भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी झाली होती.


दरम्यान, यावेळेस भाजपच्या नेतृत्वात बनणाऱ्या सरकारमध्ये त्यांचे दोन सहकारी टीडीपी आणि जदयूची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एनडीएमध्ये दुसरा आणि तिसरा पक्ष अनुक्रमे टीडीपी आणि जदयू आहे. टीडीपीकडे १६ खासदार आहेत आणि जदयूकडे १२ खासदार आहेत.

Comments
Add Comment