Friday, October 11, 2024
HomeदेशNarendra Modi : गेल्या दहा वर्षांत तर नाहीच पण पुढच्या दहा वर्षांतही...

Narendra Modi : गेल्या दहा वर्षांत तर नाहीच पण पुढच्या दहा वर्षांतही काँग्रेस १०० चा आकडा गाठणार नाही!

पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर तुफान हल्लाबोल

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या (NDA) सर्व नवनिर्वाचित खासदारांची तसेच घटक पक्षांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एकमताने एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून रविवारी ९ जूनला संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या बैठकीत सर्व घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लांबलचक भाषण करत, घटकपक्षांचे आभार मानले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही (INDIA Alliance) तुफान प्रहार केले.

नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत १०० चा आकडा गाठला नाही आणि पुढच्या १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडी पूर्वी हळूहळू बुडत होती. पण आता मी स्वच्छपणे पाहू शकतो की ते आता तेजीने आणखी खोल जाणार आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

“इंडिया आघाडी देशातील सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. भारताच्या सामान्य व्यक्तींचीही काही मतं आहेत. जे नेते जमिनीशी जोडलेले असतात त्यांनाच सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकतात. पण ते तिथे कमी पडले. मी आशा करतो की ते लोकशाहीचा सन्मान करतील. पंरतु, त्यांच्या व्यवहारामुळे वाटतं की कदाचित त्यांच्यात ही क्षमता येण्याची वाट पाहावी लागेल”, असंही ते पुढे म्हणाले.

“आपल्या पक्षाच्या पंतप्रधानाला हे किंमत देत नाहीत. त्यांचे अध्यादेश फाडतात. यांच्या नेत्यांना परदेशातील कार्यक्रमात खुर्ची नसायची. लोकशाही आपल्याला सर्वांचा आदर करायला शिकवते. विरोधी पक्षातही जे खासदार जिंकून आले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करतो. गेल्या १० वर्षांपासून मला एका गोष्टीची उणीव जाणवत होती. सखोल चर्चा, उत्तम वाद-विवाद या गोष्टींची उणीव भास होती, या नव्या खासदारांच्या निमित्ताने ही उणीव कमी भासेल अशी आशा व्यक्त करतो”, असं मोदी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -