मुंबई : मान्सून तोंडावर येताच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) अनेक उपाययोजना सुरू करण्यात येतात. अनधिकृत होर्डिंग, दरड कोसळणे, धोकादायक इमारतींची पाहणी, रस्त्यांवरील खड्डे अशा सर्व कामांचे नियोजन करण्यात येतं. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा दावा केला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांसाठी खड्डेमुक्त (Mumbai Potholes) रस्ते करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दरवर्षी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना होतात. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पावसाळ्यातील खड्ड्यांचा २४ तासात निपटारा करावा असे निर्देश दिले आहेत. त्यासोबत यावेळी पावसाळ्यात मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तर नागरिकांना होणारा खड्ड्यांचा त्रास लवकरच कमी होईल असा पालिकेने दावा केला आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवले जाईल, असे पालिकेने सांगितले. तसेच संपूर्ण मुंबईत जास्त पावसाच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजविताना प्राप्त तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे बुजविता येतील अशा रितीने मार्गांचा क्रम आखण्यात येणार आहे. त्याचबरोबर खड्डा भरताना योग्य आकारात भरला जाईल या गोष्टीचीही पालिका दक्षता घेणार आहे, असे सहआयुक्त अभिजीत बांगर यांनी म्हटले.
प्रत्येक विभागात ९ मीटरपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्यासाठी २ मास्टिक कुकर आणि ९ मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांसाठी १ मास्टिक कुकर याप्रमाणे २४ विभागांमध्ये ७२ मास्टिक कुकरचा वापर करावा. तसेच सर्व विभागातील मास्टिक कुकर हे सुस्थितीत आणि वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खात्री विभागीय पातळीवर करण्यात यावी. तसेच सर्व मास्टिक कुकरला लवकरात लवकर जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…