Saturday, July 13, 2024
HomeदेशNDA oath taking : मोदींची एकमताने एनडीएच्या नेतेपदी निवड; शपथविधीची वेळ आणि...

NDA oath taking : मोदींची एकमताने एनडीएच्या नेतेपदी निवड; शपथविधीची वेळ आणि तारीख ठरली!

८ जून नाही तर ‘या’ दिवशी होणार शपथविधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Results) एनडीएच्या (NDA) ज्या बैठका पार पडल्या, त्यातून देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले. जेडीयूचे (JDU) नितीशकुमार (Nitish Kumar) आणि टीडीपीचे (TDP) चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी भाजपाला आपले समर्थन कायम ठेवल्यामुळे एनडीएच्या सत्तास्थापनेतील सर्व अडचणी दूर झाल्या.

यानंतर आज दिल्लीतील जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची तसेच घटक पक्षांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एकमताने एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची वेळ आणि तारीखही ठरली आहे. रविवारी ९ जूनला हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

आज पार पडलेल्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडला व मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन दिले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. रविवार, ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

२०२४ च्या लोकसभा निकालांनुसार, एनडीएने २९४ जागांवर विजय मिळवला असून, त्यापैकी एकट्या भाजपने २४० जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडीला २३२ जागांवर विजय मिळाला आहे. यामध्ये एकट्या काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला आहे. एनडीएकडे २९३ खासदार आहेत, जे ५४३ सदस्यांच्या लोकसभेतील बहुमताच्या २७२ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यास सज्ज झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -