मुंबई: घरातील प्रत्येक वयस्कर व्यक्तीकडून तुम्ही देशी तूप(ghee) खाण्याबद्दल ऐकले असेल. तुपामध्ये हेल्दी फॅट आढळते जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे शरीराला ताकद तर मिळतेच सोबतच अनेक फायदेही होतात. तसेच आजारांपासून बचाव होतो. तुपाच्या सेवनामुळे आपली पाचनशक्ती तंदुरूस्त राहते. याशिवाय त्वचेलाही अनेक लाभ होतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, तसेच व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असते. यामुळे प्रत्येकाने याचे सेवन केले पाहिजे.
पाचनशक्ती सुधारते
तुपाचे सेवन केल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. कारण यात पोषक तत्वे आणि प्रोबायोटिक्स असतात जे पोटातील हेल्दी बॅक्टेरियाला वाढवतात. तुपामध्ये व्हिटामिन ए आणि ई मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहते. हार्मोन संतुलित राहते.
रोगप्रतिकारक क्षमता वाढते
तुपामध्ये ब्युटिरिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते जे शरीराला आजारांपासून लढण्यासाठी मदत करतात.
चांगले कोलेस्ट्रॉल वाढते
तुपामध्ये हेल्दी फॅट असतात जे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. तुपामध्ये ब्युटिरिक अॅसिड असते जे कॅन्सररोधी घटक आहे.
त्वचा हायड्रेट राखण्यास मदत
तुपामुळे त्वचेला फायदा होतो यामुळे त्वचेला पोषण मिळते. तसेच त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तुपामध्ये आढळणारी पोषकतत्वे त्वचा टाईट ठेवतात. तसेच वाढत्या वयाचे निशाण कमी करतात.