
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या काही अशा वाईट सवयींचे वर्णन केले आहे की ज्यामुळे मनुष्याची आर्थिक स्थिती बिघडते.
आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने अधिक खर्चाळू असू नये. धन कधीही व्यर्थ खर्च करू नये. चाणक्य यांच्या अनुसार जी व्यक्ती पैसा उगाचच वाया घालवते ती व्यक्ती नेहमी स्वत:चे नुकसान करून घेते.
जी व्यक्ती उगाचच पैसे वाया घालवते त्या व्यक्तीकडे गरज लागली असताना पैसे नसतात. यामुळे पैसे खर्च करताना आपल्या कमाईतील काही भाग बचत करणे गरजेचे असते.
आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याला जीवनात आळशी असले नाही पाहिजे. आळशी असणे हे कंगालीचे मुख्य कारण असू शकते. आळसामुळे व्यक्ती चांगल्या संधीही सोडतो. यामुळे त्याला यश मिळत नाही.
चाणक्य यांच्या मते व्यक्तीने कधीही पैशांचा गर्व करू नये. जी व्यक्ती पैशाचा गर्व करते त्या व्यक्तीकडे धन येत नाही.