Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीSunita Williams : अंतराळवीर सुनिता विल्यम्सची मोठी कामगिरी; तिसरी अवकाश झेप यशस्वी!

Sunita Williams : अंतराळवीर सुनिता विल्यम्सची मोठी कामगिरी; तिसरी अवकाश झेप यशस्वी!

मुंबई : भारतीय वंशाची अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) १ जून रोजी तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला जाणार होती. मात्र हा प्रवास अंतिम टप्प्यात येऊन यंत्रणा बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे सुनीता विल्यम्सची तिसरी झेप लांबणीवर गेली होती. त्यानंतर आता सुनिता विल्यमस यांची तिसरी अवकाश भरारी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या या पहिल्या सदस्य बनून त्यांनी नवा इतिहास रचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी काल संध्याकाळी केप कॅनाव्हेरल येथील प्रक्षेपण तळावरून बोईंगच्या स्टास्लाइनर अंतराळयानातून झेप घेतली. विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांचे हे उड्डाण काही तांत्रिक समस्यांमुळे पूर्वी दोन वेळा रद्द करण्यात आले होते. मात्र, काल यानाने यशस्वीरित्या झेप घेतली आहे.

बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट (सीएफटी) नावाचे हे मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या रुपात सुरू करण्यात आले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू फ्लाइटसाठी स्टारलाइनर प्रमाणित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. हे मिशन यशस्वी ठरल्यास अंतराळवीरांना कक्षेतील लॅबमध्ये घेऊन जाणे आणि तेथून आणणारे स्टारलाइनर हे स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगननंतरचे दुसरे खासगी अवकाशयान ठरणार आहे.

दरम्यान, सुनीता आणि विल्मोर हे सुमारे एक आठवडा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर राहणार असून त्यानंतर ते पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करतील. तर १० जून रोजी पॅराशूट आणि एअरबॅगच्या आधारे ते अमेरिकेच्या नैऋत्य भागात उतरणार आहेत, अशी माहिती नासाने दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -