Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीकोकण पदवीधरमध्ये भाजपाच्या निरंजन डावखरेंकडून अर्ज दाखल

कोकण पदवीधरमध्ये भाजपाच्या निरंजन डावखरेंकडून अर्ज दाखल

पेण : कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत आज अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल,असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून, मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे.

निरंजन डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याच्या महिला-बालविकास मंत्री अदिती तटकरे, पेणचे आमदार रवीशेठ पाटील, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, संजय केळकर, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, निलेश राणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी आमदार डॉ.विनय नातू, संदीप नाईक, अनिकेत तटकरे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील आदींसह भाजपाचे पेण, रायगडसह कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -