Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीMNS Election : पक्षस्थापनेनंतर पहिल्यांदाच मनसेअंतर्गत होणार खुली निवडणूक!

MNS Election : पक्षस्थापनेनंतर पहिल्यांदाच मनसेअंतर्गत होणार खुली निवडणूक!

राज ठाकरेंच्या वाढदिवशी होणार मनसेच्या अध्यक्षपदाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) म्हणजेच मनसेच्या संपूर्ण राजकीय वाटचालीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसेचे संस्थापक व अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवशी १४ जूनला मनसेमध्ये पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणूक (Election within party) पार पडणार आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्षपदासाठी (MNS President) ही खुली निवडणूक होणार आहे. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे १४ जूनला दुपारी ३ वाजता ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे.

मनसेचे नेते व सरचिटणीस यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षांतर्गत निवडणुका याआधीही होत होत्या, पण त्या कागदोपत्री पार पाडल्या जात असत. यावेळेस प्रथमच खुली निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांचीच निवड होण्याची शक्यता जास्त आहे, मात्र, तरीही सावधगिरी म्हणून ही निवडणूक घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

का घेण्यात आला हा निर्णय?

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात राजकीय सत्तांतरे झाली. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये कायदेशीर आणि निवडणूक आयोगाच्या दालनात जो संघर्ष झाला, सुनावण्या पार पडल्या त्याचे राज्याच्या राजकारणावर झालेले परिणाम अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. वारसा हक्काने आलेल्या अध्यक्षपदामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आपल्याला वगळले जात असल्याची भावना निर्माण झाली आणि त्यातून हे पक्ष फुटले. ही बाब लक्षात घेऊन मनसेअंतर्गत लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -