मुंबई महापालिका प्रशासनाचा दावा
मुंबई : मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे जानेवारी, २०२४ पासून सुरु आहे. त्यानुसार, आजमितीस टप्पा-१ नुसार गाळ काढण्याची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत, असा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. या मिठी नदीतून सन २०२४ या वर्षाकरीता सुमारे २ लाख ७० हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दीष्ट आहे. त्यातील टप्पा – १ अंतर्गत पावसाळ्यापूर्वी एकूण २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दीष्ट आहे.
‘मिठी नदीत कच-याचे ढीग, गाळाचा खच’ या शीर्षकाखाली प्रसिध्द झालेले वृत्त तथ्थहिन असून या ठिकाणी नदीतील गाळ, जलपर्णी व तरंगता कचरा काढण्याचे काम १९ मार्च २०२४ व ०३ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आले आहे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मिठी नदीचा विमानतळ पूलअ ते माहीम कॉजवे दरम्यानचा भाग भरती प्रवण क्षेत्रात येतो. या भागात नदीचा तळ समतल आहे. नदीची रुंदी १०० ते २२० मीटर एवढी आहे. त्यामुळे या भागात दररोज अवसादन (सेडिमेंटेशन)) होऊन अतिरिक्त गाळ साठतो.
भरती प्रवण क्षेत्र वगळता मिठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवत असते. मिठी नदीच्या काठालगत बहुतांश ठिकाणी अतिक्रमणे असल्याने नदीत दररोज विविध पातमुखाद्वारे तरंगता कचरा येतो. नदीतील गाळ, तरंगता कचरा व जलपर्णी काढण्याच्या कामात सुलभता व कार्यक्षमता वाढवून परिमाणकारकरित्या काम करण्यासाठी आधुनिक पध्दतीची यंत्रसामुग्री जसे सिल्ट पुशिग पन्टुन मशील व मल्टीपर्पज एम्फीबीअस् पन्टुन मशीन तसेच, पन्टुन माऊंटेड, पोकलेन व पोकलेन मशिन यांचा वापर करण्यात येत आहे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.