Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीBird Flu : धोक्याची घंटा! कोरोनानंतर जगभरात बर्ड फ्लूचे थैमान

Bird Flu : धोक्याची घंटा! कोरोनानंतर जगभरात बर्ड फ्लूचे थैमान

WHOकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन

मुंबई : जगभरात कोरोनाच्या (Corona Virus) महामारीनंतर पुन्हा एकदा चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या थैमानानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) बर्ड फ्लू (Bird Flu) प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे सांगितले आहे. काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील दोघांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता. वेळेत केलेल्या उपचारामुळे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एका परदेशी महिलेला बर्ड फ्लूने ग्रासले असून तिचा बळी गेला आहे. या घटनेमुळे जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाली असून नागरिकांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डब्लूएचओने बर्ड फ्लू प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानंतर बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची पुष्टी केली आहे. मेक्सिकोमधील एका ५९ वर्षीय महिलेमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसून येत होती. ती तीन आठवडे अंथरुणाला खिळलेली होती. गंभीर लक्षणांमध्ये ग्रस्त असलेल्या आजारपणात या महिलेचा मृत्यू झाला. मात्र या महिलेचा कोणत्याही पोल्ट्री किंवा इतर प्राण्यांशी संपर्क आला नव्हता. तरीही तिच्यामध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यामुळे याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले.

माणसांमध्ये संक्रमण शक्य आहे का?

बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांच्या संपर्कातून माणसांमध्ये प्रवेश करु शकतो. माणसांमध्ये या विषाणूच्या संक्रमणामुळे होणारा जास्तीत जास्त मृत्यूदर हा ६० टक्के इतका आहे. आणि याची क्षमता कोरोना व्हायरसपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली आहे, त्यामुळे हे चिंतेचे कारण बनले आहे. सध्या या फ्लूचे माणसांकडून माणसांकडे संक्रमण होण्याबाबत कसलीही उदाहरणे आढळली नाहीत. मात्र ज्या व्यक्तीचा पक्ष्यांशी संपर्क आहे त्यांनाच हा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

मानवामध्ये बर्ड फ्लूची प्रमुख लक्षणे

डोळा लाल होणे, ताप येणे, खोकला, घसा खवखवणे, वाहणारे किंवा भरलेले नाक, स्नायू किंवा शरीर दुखणे, डोकेदुखी, थकवा, श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अतिसार, मळमळ, उलट्या होणे ही मुख्य लक्षणे दिसून येतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -