मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये युगांडाचा क्रिकेट संघ पहिल्यांदा खेळत आहे. या संघात ४३ वर्षीय खेळाडूचाही समावेश आहे. फ्रँक नसुबुगा टी-२० वर्ल्डकप २०२४मधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे तो ४३ वर्षीय वयात आपला पहिला टी-२० वर्ल्डकप खेळत आहे. इतकंच नव्हे तर नसुबुगाने पापुआ न्यू गिनीविरुद्ध वर्ल्डकप सामन्यात इतिहास रचला.
त्याने आपल्या ४ ओव्हरमध्ये २ ओव्हर मेडन टाकत २ विकेट मिळवल्या. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात एखाद्या गोलंदाजांने ४ षटकांत दिलेल्या सर्वाधिक कमी धावा आहेत.
नसुबुगाने या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. त्याने याच वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत ७ धावा खर्च करत ४ विकेट मिळवल्या होत्या.
पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यातील टी-२० वर्ल्डकप च्या ९व्या सामन्यात गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये आमनेसामने होत्या. या सामन्यात पीएनजीने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्यांदा बॅटिंग करत १९.१ षटकांत ७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात युगांडाने १८.२ षटकांत ७ विकेट गमावत आव्हान पूर्ण केले. फ्रँक नसुबुगाने एकच्या इकॉनॉमीने ४ षटकांत २ ओव्हर मेडन टाकल्या आणि २ विकेट गमावले.