
लवकरच प्रोमोशन सुरु होणार
मुंबई : आपल्या विविधांगी भूमिकांमुळे सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा कायम चर्चेत असतो. 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma) च्या भरघोस यशानंतर स्वप्नील जोशी पुन्हा एकदा अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्याच्या भूमिकेत दिसलेला स्वप्नील पुन्हा एकदा अभिनेता म्हणून सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी सिनेमासृष्टीत नुकतेच महिलांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. बाईपण भारी देवा, झिम्मा, नाच गं घुमा त्यानंतर आता 'बाई गं' (Bai Ga) चित्रपट धुमाकूळ घालणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे स्वप्नील जोशीने सांगितले आहे.
'या' दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार
स्वप्नीलने आज त्याच्या सोशल मीडियावर एका अभिनेत्री सोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये 'बाई गं' चित्रपट येत्या १२ जुलै रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. त्यासोबत स्वप्नीलने शूट दरम्यान एक व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. स्वप्नीलने कॅप्शनमध्ये 'बाई गं ची रिलीज तारीख ठरली आहे, लवकरच प्रोमोशन सुद्धा सुरू होईल. तो पर्यंत चित्रपटातल्या ६ अभिनेत्री पैकी या व्हिडिओ मध्ये कोण अभिनेत्री आहे हे ओळखा!' असे लिहिले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना यामध्ये अभिनेत्री नक्की कोण? असा प्रश्न पडला आहे.
स्वप्नील जोशीचे आगामी चित्रपट
स्वप्नील जोशी येत्या काळात विविध भूमिका साकारणार आहे. बाई गं नंतर तो 'जिलेबी' या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. दरम्यान, स्वप्नीलने आणखी एक पोस्ट टाकून नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या फोटोमध्ये दुनियादारी चित्रपटातील सर्व कलाकार दिसत आहेत. त्यामुळे 'दुनियादारी २' येणार का? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे.
View this post on Instagram