Saturday, July 5, 2025

Spiritual: गुरूवारच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत, काय आहे धार्मिक महत्त्व

Spiritual: गुरूवारच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत, काय आहे धार्मिक महत्त्व

मुंबई: आपल्या जीवनात रंगांना विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात रंगांना आपल्या सुख-दुखा:शी जोडण्यात आले आहे. हिंदू धर्मात कोणत्या ना कोणत्या दिवसाला रंगाचा प्रयोग केला पाहिजे याचे वर्णन करण्यात आले आहे. ६ जूनला गुरूवार आहे. गुरूवारच्या दिवशी कोणता रंग प्रदान करणे शुभ असते हे जाणून घेऊया...


सर्वांनाच माहित आहे की गुरूवारचा दिवस विष्णूदेवाचा प्रिय दिवस आहे. गुरूवारचा दिवस हा श्री दत्तगुरूंचाही दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक शास्त्रात या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक सांगितले आहे.


पिवळ्या रंगाचे कपडे गुरूवारी घालणे शुभ मानले जाते. तसेच पिवळा, नारिंग, केशरी रंगही या दिवशी परिधान केला जाऊ शकतो.


जर तुम्हाला गुरूवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे जमत नसेल तर त्या दिवशी गुलाबी अथवा पिवळसर रंगाचे कपडे घाला.



पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचे फायदे


गुरूवारी पिवळा रंग घातल्याने ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.


पिवळा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो.


पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो.



गुरूवारी पिवळ्या रंगाच्या वस्तू करा दान


गुरूवारी पिवळ्या रंगाच्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते.


या दिवशी गरजवंताना चणे अथवा चण्याची डाळ दान करा.

Comments
Add Comment