मुंबई: युगांडाच्या संघाने पापुआ न्यू गिनीला टी-२० वर्ल्डकपच्या(world cup 2024) सामन्यात हरवले. ९व्या सामन्यात युगांडाने पापुआ न्यू गिनीवर ३ विकेटनी मात दिली. याआधी युगांडाच्या कर्णधाराने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या पापुई न्यू गिनीने १९.१ षटकांत केवळ ७७ धावा केल्या होत्या. यामुळे युगांडासमोर विजयासाठी ७८ धावांचे सोपे आव्हान होते.
मात्र हे आव्हान गाठता गाठता युगांडाचे ७ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, युगांडाला या सामन्यात यश मिळवता आले. युगांडाने १८ षटकांच ७ विकेट गमावताना हे लक्ष्य पूर्ण केले. युगांडासाठी रियाजत अली शाहने सर्वाधिक ५६ बॉलमध्ये ३३ धावा केल्या.त्याने आपल्या खेळीत एक चौकार लगावली.
याशिवाय जुम्मा मियागीने १६ बॉलमध्ये १३ धावांचे योगदान दिले. मात्र युगांडाचे सात फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. रियाजत अली शाहच्या धीमी खेळीमुळे युगांडाला हा विजय साकारता आला. त्यांचा हा पहिलाच विजय आहे.
पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजाचा फ्लॉप शो
याआधी टॉस हरल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या पापुआ न्यू गिनीची सुरूवात खराब झाली. या संघाचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. पापुआ न्यू गिनीसाठी हीरी हीरीने सर्वाधिक १९ बॉलमध्ये १५ धावांचे योगदान दिले. तर लिगा सियकान १७ बॉलमध्यै १२ धावा केल्या. किपलिन डोगरियाने २० बॉलमध्ये १२ धावा केल्या. मात्र इतर फलंदाज अयशस्वी ठरले.