Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीनीटच्या विद्यार्थिनीची ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

नीटच्या विद्यार्थिनीची ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कोटा : कोटा येथे पुन्हा एकदा विद्यार्थिनीच्या आत्महत्येने हादरले आहे. नीटची तयारी करत असलेल्या एमपी रीवा येथील एका विद्यार्थिनीने तिच्या अपार्टमेंटच्या ९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेने तिला गॅलरीतून उडी मारताना पाहिले. महिलेला काही समजण्यापूर्वीच विद्यार्थिनीने उडी घेतली. नीटचा निकाल एक दिवस आधी आला होता. कमी मार्कांमुळे तिला नैराश्याने ग्रासले होते.

शंका दूर करण्यासाठी ती बुधवारी दुपारी वर्गातही गेली होती. राजस्थान येथील जवाहर नगर भागात बुधवारी दुपारी ४ वाजता ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये विद्यार्थिनी उडी मारताना दिसत आहे. एका महिलेने तिला फ्लॅटमधून बाहेर येताना पाहताच बगीशा हिने उडी मारली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. कोटाच्या एसपी अमृता दुहान यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर घटनेच्या व्हिडिओवरून कल्पना घेऊन जर कोणी आत्महत्या केली तर सीसीटीव्ही चालवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल अशी तंबी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बगिशा तिवारी (वय १८) ही रीवा मध्य प्रदेशातील गुढ अनंतपूर) येथील रहिवासी होती. ती कोटा येथील जवाहर नगर भागात पुखराज एलिमेंट बिल्डिंगच्या फ्लॅट क्रमांक ९ मध्ये राहत होती. आई आणि लहान भाऊही एकत्र राहत होते. बगिशा ३ वर्षांपासून नीटची तयारी करत होती. तिचा भाऊ अकरावीत शिकतो. तो जेईईची तयारीही करत आहे. विद्यार्थ्याचा नीटचा निकाल एक दिवस आधी आला होता.

नीटचा निकाल ४ जूनला लागला. यामध्ये बगिशा हिला ७२० पैकी ३२० गुण मिळाले होते. ती नीटची परीक्षा पास झाली नाही. पालकांनी कमी मार्क्स मिळाले तरी हरकत नाही असे सांगितले. आम्ही तुला कुठल्यातरी खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ असेही सांगितले. ती आणखी एक वर्ष अभ्यास करणार होती. सध्या देशातील टॉप ५३ शहरांमध्ये कोटा आत्महत्यांच्या घटनांमध्ये ४५ व्या क्रमांकावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -