मुंबई : अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’चे होस्ट झाल्याबद्दल प्रेक्षकांमध्ये शो बद्दल उत्सुकता विविध भूमिका साकारण्यापासून, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडण्यापासून ते पॅथब्रेकिंग चित्रपटांची निर्मिती करण्यापर्यंत अभिनेते अनिल कपूरने कायम चर्चेत आहेत. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अनिल कपूरने कायम दर्जेदार अभिनय केले आहेत.
किंबहुना मेगास्टारच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकल्यास अनिल कपूर अपारंपरिक आणि व्यावसायिक भूमिकांमध्ये कसा अफलातून कलाकार आहे हे लक्षात येते.
View this post on Instagram
आता अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी’ च्या आगामी सीझनचे होस्ट झाले असून त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. लोकप्रिय रिॲलिटी शो OTT वर तिस-या सीझनसाठी परत येत असून अनिल कपूर होस्टच्या नवीन भूमिकेत दिसणार आहेत. जो त्याने यापूर्वी कधीही केला नव्हता.
होस्ट म्हणून अनिल कपूरची पहिली झलक इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे आणि चाहत्यांनी या बद्दल उत्सुकता आहे अनिल कपूर ने या आधी त्यांचा सोशल मीडिया फॉलोअर्सना त्याच्या होस्टिंग डेब्यूबद्दल एक हिंट दिली होती त्याच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अभिनेत्याने लिहिले “सुना है बिग बॉस ओटीटी 3 का होस्ट बडा गुड लुकिंग है” खरं तर निर्मात्यांनी शोची एक झलक देखील शेअर केली जी अनिल कपूरच्या होस्टिंग शैलीची एक परिपूर्ण झलक होती.
अनिल कपूरच्या यांच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे आणि आता ते ‘बिग बॉस OTT 3’ वर आपली छाप कशी सोडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा शो लवकरच जिओ सिनेमावर येणार आहे.
कामाच्या आघाडीवर ‘बिग बॉस ओटीटी’च्या पलीकडे अनिल कपूरकडे सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’ आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याचीही अफवा आहे.