Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीअखिलेश यादव यांनी तोडला मुलायम सिंह यादव यांचा रेकॉर्ड!

अखिलेश यादव यांनी तोडला मुलायम सिंह यादव यांचा रेकॉर्ड!

मुंबई:समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपले वडील आणि पक्षाचे संस्थापक राहिलेले मुलायम सिंह यादव यांचा रेकॉर्ड तोडला आहे.

२०१७ पासून ते आतापर्यंतंच्या निवडणुकीच हरलेल्या अखिलेश यादव यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला नवसंजीवनी दिली. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव शेवटचे २०१२मध्ये एखादी मोठी निवडणूक जिंकले होते.

त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, २०१७ विधानसभा निवडणूक, २०१९ची लोकसभा निवडणूक आणि २०२२मध्ये समाजवादी पक्षाची कामगिरी चांगली नव्हती. मात्र २०२४मध्ये मात्र समाजवादी पक्षाने जबरदस्त कामगिरी केली. स्थापनेनंतर २००४च्या निवडणुकीत सपाने ३६ जागा मिळवल्या होत्या. त्यानंतर आता सपाने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात २०२४च्या निवडणुकीत ३७ जागांवर यश मिळवले आहे.

कधी किती जागा जिंकल्या 

लोकसभेत सपाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास १९९६मध्ये १६, १९९७मध्ये १९, १९९९ मध्ये २६, २००४मध्ये ३६, २००९मध्ये २३,२०१४मध्ये पाच, २०१८मध्येही पाच जागा मिळवल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -