Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीBeed Loksabha : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्या गाडीला अपघात

Beed Loksabha : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्या गाडीला अपघात

मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असताना घडला हा प्रकार

बीड : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) निकाल काल जाहीर झाले आणि बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांचा विजय झाला. बजरंग सोनावणे व भाजपाच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पॅटर्नमुळे भाजपाला मराठवाड्यात काहीसा धक्का मिळाल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे अखेर बजरंग सोनावणे यांनी विजय पक्का केला. त्यानंतर ते मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

बीडमध्ये निवडणूक अधिकारींकडून विजयाचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी लोकांसोबत जल्लोषामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर ते मध्यरात्रीच जरांगेच्या भेटीसाठी निघाले. त्याचवेळी बजरंग सोनवणेंच्या ताफ्यातील एक गाडी त्यांच्या गाडीला धडकली. या अपघातात काही जखमी झाले. या जखमींवर उपचार सुरू आहेत. रात्री अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात जालना जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावर रात्री उशीरा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सोनावणे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे जात असताना शहागड पुलाच्या बाजूला ताफ्यातील एक कार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला येऊन धडकली. ताफ्यातील गाडी धडकल्याने बजरंग सोनवणे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला. मात्र तिथून अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे सोनवणे यांनी भेट घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -