हवाई दलाचे बचावकार्य सुरु
डेहराडून : अनेकांना ट्रेकिंग (Trekking) करण्याची फार आवड असते. मात्र हेच ट्रेकिंग कधी जीवावर बेतेल हे काही सांगता येत नाही. अशातच उत्तराखंडमधून एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सहस्त्रतालच्या ट्रेकसाठी गेलेल्या २२ सदस्यीय ट्रेकिंग ग्रुपमधील ८ जणांचा खराब हवामानामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळली आहे. तर उर्वरित १४ ट्रेकर्स अडकले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील १८ सदस्य आणि महाराष्ट्रातील १ आणि ३ स्थानिक ट्रेकर्स सहस्त्रताल या ठिकाणी ट्रेकसाठी निघाले होते. ट्रेकिंग दरम्यान अचानक खराब हवामानामुळे, दाट धुके आणि बर्फवृष्टीमध्ये ही टीम अडकली व त्यांना तेथे योग्य व्यवस्था नसल्याने ट्रॅकर्संना संपूर्ण रात्र थंडीत काढावी लागली. मात्र या थंडीमुळे ८ ट्रेकर्सचा मृत्यू झाला असून काही जण त्या हिमवृष्टीत अडकले असल्याची माहिती ट्रॅकिंग एजन्सीच्या मालकाने दिली आहे.
हवाई दलाचे बचावकार्य सुरू
अडकलेल्या ट्रेकर्स आणि मृतदेहांची सुटका करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हवाई दलाच्या माध्यमातून हेली रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याची विनंती केली होती. त्यानुसार हवाई दलाचे दोन चेतक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.
६ ट्रेकर्सची सुटका
सहस्त्रतालमध्ये अडकलेल्या ६ ट्रेकर्सची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये सौम्या विवेक (३७), विनय कृष्णमूर्ती (४७), शिव ज्योती, सुधाकर बीएस नायडू (६४), सुमृती (४०), सीना (४८) यांचा समावेश आहे.