न्यूयॉर्क: टीम इंडियाने(team india) टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) आपल्या अभियानाची विजयी सुरूवात केली आहे. आयर्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९६ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान १२.२ षटकांत २ विकेट गमावत पूर्ण केले.
भारताकडून रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ३७ बॉलमध्ये ५२ धावा तडकावल्या. सलामीला आलेला विराट कोहली एकच धाव करून बाद झाला. तर ऋषभ पंत ३६ धावांवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने २ धावा केल्या.
याआधी भारताच्या तिखट माऱ्यासमोर आयर्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. हार्दिक पांड्याच्या ३ विकेट, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहच्या प्रत्येकी २ विकेट याच्या जोरावर आयर्लंडला केवळ ९६ धावाच करता आल्या होत्या.आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने सर्वाधिक २६ धावा करत संघाला थोडाफार स्कोर मिळवून देण्यात मदत केली.
सुरूवातीपासूनच आयर्लंडचे फलंदाज अंतराअंतराने बाद होत गेले. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने हा सामना जिंकला आहे.