Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीStock Market: मंगळवारी आला होता भूकंप...आज दिसतेय चांगली स्थिती, उघडताच सेन्सेक्सने घेतली...

Stock Market: मंगळवारी आला होता भूकंप…आज दिसतेय चांगली स्थिती, उघडताच सेन्सेक्सने घेतली ६०० अंकांची उसळी

मुंबई: शेअर बाजारात(share market) मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान मोठा भूकंप आला होता. यातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्स ६००० अंकांहून अधिक अंकांनी बुडाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये तब्बल १९०० अंकांपर्यंत घसरला होता.

दरम्यान, मार्केट बंद होत होता साधारण २०० अंकांची रिकव्हरी पाहायला मिळाली होता. आज बाजार वाढीसोबतच सुरू झाला आणि सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्सनी हिरव्या निशाणावर कारभार सुरू केला. सकाळी ९.१५ वाजता मार्केट सुरू होताना सेन्सेक्स ६७२.८४ अंक म्हणजेच ०.९३ टक्क्यांच्या उसळीसह ७२,७५१ अंकाच्या स्तरावर सुरू झाला.

मंगळवारी आला होता भूकंप

याआधी मंगळवारच्या कारभाराची बात केली असता. मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ३० शेयरचा सेन्सेक्स १७०० अंकांनी तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ४०० अंकांच्या घसरणीसह सुरू झाला होता. जसजसे निकाल येण्यास सुरूवात झाली तसतसा बाजार विखुरत गेला. दुपारी १२ वाजेपपर्यंतच्या जवळपास सेन्सेक्स ६०९४ अंकांपर्यंत कोसळला होता तर निफ्टीही १९०० अंकांपर्यंत घसरली होती.

दरम्यान मार्केट बंद होईपर्यंत यात रिकव्हरी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये ४३८९.७३ अंकांनी पडून ७२,०७९.०५ अंकांवर बंद झाला तर निफ्टीमध्ये १३७९.४० अंकांनी तुटून २१,८८४.५०च्या स्तरावर बंद झाला होता. शेअर बाजारात आलेल्या या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचे ३१ लाख कोटी डुबले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -