Friday, October 4, 2024
Homeक्रीडाNEP vs NED: नेदरलँड्सचा 'आर्यनमॅन' मॅक्स ओडाऊड, एकट्याच्या जीवावर जिंकून दिला सामना

NEP vs NED: नेदरलँड्सचा ‘आर्यनमॅन’ मॅक्स ओडाऊड, एकट्याच्या जीवावर जिंकून दिला सामना

मुंबई: नेदरलँड्सने नेपाळला ६ विकेटनी हरवत टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये आपल्या अभियानाची विजयी सुरूवात केली आहे. डच संघासाठी सर्वाधिक धावा मॅक ओडाऊडने केल्या. त्याने ४८ बॉलमध्ये ५४ धावा करत नेदरलँड्सच्या विजयात मोलाचे योगदान किले.

ओडाऊडने आपल्या खेळीदरम्यान ४ चौकार आणि एक षटकार लगावला. नेपाळने पहिल्यांदा खेळताना १०६ धावांचा स्कोर केला होता. नेपाळसाठी सर्वाधिक धावा कर्णधार रोहित पौडेलने केल्या. त्याने ३७ बॉलमध्ये ३५ धावांची खेळी केली. नेपाळ संपूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. दरम्यान, पिच ही फलंदाजीसाठी सोपीही नव्हती. यासाठी नेदरलँड्सला विजय मिळवण्यासाठी १९ षटके लागली. मात्र अखेरीस नेदरलँड्सने ८ बॉल राखत विजय मिळवला.

नेदरलँड्समोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान होते. मात्र यूएसएच्या पिचनी खूप निाश केले. आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सने ३ धावात पहिला विकेट गमावला होता. त्यानंतर मॅक्स ओडाऊड आणि विक्रमजीत सिंह यांच्यात ४० धावांची भागीदारी झाली.

पॉवरप्ले संपेपर्यंत नेदरलँड्सने एक विकेट गमावत ३६ धावा केल्या होत्या. मात्र ९व्या षटकात विक्रमजीत २२ धावा करून बाद झाला. धावांची गती खूप कमी झाली होती यामुळे १० षटकांत नेदरलँड्सला केवळ ५२ धावाच करता आल्या. पुढील ३ षटकांत १९ धावा आल्या. मात्र १४ल्या षटकांत सोमपाल कामी १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

कर्णधार स्कॉट एडवर्ड्स काही कमाल करू शकण्याआधीच अबिनाश बोहराने त्याला ५ धावांवर क्लीन बोल्ड केले. संघाला शेवटच्या ५ षटकांत २८ धावांची गरज होती. यावेळेस मॅक्स ओडाऊड क्रीझवर होता. शेवटच्या २ षटकांत नेदरलँड्सला १३ धावा करायच्या होत्या. मॅक्सला शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना खेचायचा नव्हता. त्यामुळे त्याने बास डी लीडसोबत मिळून १९व्या षटकांत १५ धावा करत नेदरलँड्सला पहिला विजय मिळवून दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -