Tuesday, April 22, 2025
HomeदेशLok Saha Election Result 2024: २४० जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष, शतकापासून...

Lok Saha Election Result 2024: २४० जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष, शतकापासून मागे राहिली काँग्रेस

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४चे(loksabha election 2024) निकाल लागले आहेत. मंगळवारी ४ जूनला सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया बुधवारपर्यंत सुरू होती. सर्व ५४३ जागांवरील निकाल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २४० जागांवर विजय मिळवला आहे तर ९९ जागांवरील विजयासह काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे.

इतर मोठ्या पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास इंडिया आघाडीमध्ये सामील आणि उत्तर प्रदेशात भाजपचे सर्वात मोठे नुकसान करणाऱ्या समाजवादी पक्षाला यावेळेस ३७ जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षानंतर ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेसने २९ जागांवर विजय मिळवला आहे.

टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जदयूला चांगले यश

द्रविड मुन्नेत्र कडगम ने या लोकसभा निवडणुकीत २२ जागांवर यश मिळवले. तेलुगु देसम पार्टीने १६ जागा मिळवण्यात यश मिळवले. यानंतर नंबर येतो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाचा. जेडीयूने या निवडणुकीत १२ जागांवर यश मिळवले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दाखवली ताकद

राज्यात उद्धव ठाकरेंना मोठे यश मिळाले. त्यांचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत ९ जागा मिळाल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा, शिंदे गटाला ७ जागा मिळाल्या. बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाला ५ जागांवर यश मिळाले.

आंध्र प्रदेशातील सत्तेत सहभागी वायएसआरसीपीला यावेळेस मोठे नुकसान झाले. एकीकडे राज्यातील सत्ता त्यांच्या हातून गेली दुसरीकडे त्यांना केवळ ४ जागांवर यश मिळाले. बिहारमध्ये आरजेडीला ४ जागांवर यश मिळवता आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -