Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Kalki 2898 AD Trailer : प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट जारी

Kalki 2898 AD Trailer : प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट जारी

मुंबई : प्रभासचा बहुप्रतिक्षीत 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD) चित्रपटाचे लाखो चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच चाहत्यांना एक आनंदाची माहिती मिळत आहे. 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. तर चाहत्यांना या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) कधी पाहायला मिळणार याची प्रतिक्षा लागली होती. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'कल्की २८९८ एडी' ची ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे.



'या' तारखेला होणार ट्रेलर रिलीज


नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला, 'कल्की २८९८ एडी' हा एक पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अनेक साऊथ कलाकारांनी कॅमिओ केला आहे. प्रेक्षकांना हा कॅमिओ पाहण्यासाठी केवळ काहीच दिवस वाट पहावी लागणार असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले. कल्की २८९८ एडी'चा ट्रेलर १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.



चित्रपटाचं बजेट तब्बल ६०० कोटी


'कल्की २८९८ एडी' चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन आणि दिशा पटानी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या पौराणिक चित्रपटामध्ये महाभारत ते इसवी सन २८९८ पर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. वैजयंती मूव्हीज आणि सी. आसवानी दत्त अंतर्गत हा चित्रपट निर्मित केला गेला आहे. तर हा चित्रपट सुमारे ६०० कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment