Sunday, December 8, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : सरकारमधून मोकळं करण्याच्या फडणवीसांच्या निर्णयावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

Devendra Fadnavis : सरकारमधून मोकळं करण्याच्या फडणवीसांच्या निर्णयावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली समोर

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधानी राहावे लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३० जागांवर विजय मिळवला. यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेत सरकारमधून मोकळं करण्याची विनंती पक्षनेतृत्वाकडे केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत घोषणा केली. अनपेक्षित जागा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी दर्शवली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

दरम्यान, फडणवीसांच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आम्ही भविष्यातही एकत्र काम करणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, निवडणुकीत हारजित होत असते. एका निवडणुकीमुळे आम्ही खचणार नाही. एकत्र टीम म्हणून भविष्यातही काम करणार आहोत. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे सध्याच्या कामगिरीची जबाबदारी ही सामूहिक आहे. आमच्या एकूण जागा जरी कमी झाल्या असल्या तरी राज्यातील मतांची टक्केवारी जास्त आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Devendra Fadnavis : ‘लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो; मला सरकारमधून मुक्त करा’

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे. पराभवाची कारणमीमांसा केली जाईल. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहेत. देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही. जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -