Tuesday, November 12, 2024
Homeताज्या घडामोडीGold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात घसरण

Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात घसरण

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं चांदीचे भाव

मुंबई : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोनं आणि चांदीच्या दरात सध्या काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोनं चांदीचा दर घसरला आहे. त्यामुळे सोनं चांदी खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसानंतर आज तिसऱ्या दिवशी १०० ग्राम सोनं २००० रुपयांनी उतरले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं व चांदीच्या किंमती काय आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६७,५०० रुपये इतकी आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६६,७५० रुपये, ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,४०० रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ६,६७५ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याची किंमत ७,२८० रुपये आणि ८ ग्राम सोन्याची किंमत ५८,२४० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ७२,८०० रुपये इतकी आहे. तसेच १०० ग्राम सोन्याची किंमत ७,२८,००० रुपये इतकी आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे भाव

मुंबई आणि पुण्यातील एक ग्राम सोन्याचे दर हे २२ कॅरेट ६,६०० रुपये, २४ कॅरेट ७,२६५ रुपये आणि १८ कॅरेट ५,४४९ रुपये आहेत.

चांदीच्या किंमती

सोन्याप्रमाणे प्रति किलो चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदीची किंमत ९१,७०० रुपये आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, लखनऊ, पटना, अहमदाबाद या सर्वच शहरांत देखील चांदीची किंमत ९१,७०० रुपये इतकी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -