Thursday, October 3, 2024
HomeदेशNDA Government : एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा!

NDA Government : एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा!

नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी भाजपला सोपवलं समर्थन पत्र

नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) जाहीर झाला व २९३ जागांसह एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, त्यासोबतच इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३४ जागांसह चांगली कामगिरी केली. यातील देशपातळीवर मुख्य लढत असलेल्या भाजपा (BJP) व काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही.

त्यामुळे यंदा सत्तास्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची भूमिका किंगमेकरची ठरणार होती. त्यामुळे आता नेमकं कोणाचं सरकार स्थापन होणार याबाबत देशवासियांची उत्सुकता ताणली गेली होती. ही उत्सुकता आता संपली असून देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

लोकसभेचा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएच्या विजयी खासदारांची व प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली होती. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नितीश कुमारांशी संपर्क साधल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. त्यामुळे एनडीएच्या सत्तास्थापनेत अडचण निर्माण होणार की काय , अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, बहुमत मिळाल्यानंतर एनडीएची राजधानी दिल्लीमध्ये पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीत १६ घटक पक्षांनी भाजपला समर्थन पत्र सोपवलं आहे. शिवाय नितीस कुमार व चंद्राबाबू नायडू यांनीही भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आपलं पाठिंब्याचं पत्र सोपवलं आहे. या निर्णयामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दिलासा मिळाला असून एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -