Tuesday, July 1, 2025

Shrikant Shinde : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची होणार हॅटट्रिक!

Shrikant Shinde : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची होणार हॅटट्रिक!

१ लाख १८ हजारांहून अधिक मतांनी विजयी आघाडी


कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये (Kalyan) मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची हॅटट्रिकच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तब्बल १ लाख १८ हजारांहून अधिक मतांनी श्रीकांत शिंदे यांनी विजयी आघाडी साधली आहे.


श्रीकांत शिंदे हे २०१४ पासून खासदार राहिले आहेत. २०१४, २०१९ आणि आता २०२४ मध्येदेखील श्रीकांत शिंदे यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याने खासदारकीची हॅटट्रिक होणार आहे. तर मविआच्या वैशाली दरेकर या ठिकाणी मागे पडल्या आहेत.


महायुतीमध्ये कल्याणच्या जागेवरुन बरेच मतभेद रंगले होते. मात्र, एकनाथ शिंदेंनी ही जागा आपल्याकडे खेचून घेत कल्याणमध्ये शिवसेनेचा विजय पक्का केला आहे. त्यामुळे महायुतीची ताकद या ठिकाणी वाढली आहे.

Comments
Add Comment