Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीShare Market: आज वेळेआधी बंद होणार बाजार! गुंतवणूकदारांनी वेळ घ्या नोंदवून

Share Market: आज वेळेआधी बंद होणार बाजार! गुंतवणूकदारांनी वेळ घ्या नोंदवून

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे(loksabha election 2024) मतदान सुरू झाले आणि मतदारांचा पहिला कौल आला आणि शेअर बाजाराला जबरदस्त झटका बसला. सोमवारच्या दिवशी अत्यंत उंचीवर गेलेले सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी निकालाच्या दिवशी मात्र चांगलेच आपटले.

सेन्सेक्स कोरोना काळानंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात घसरला. ५ टक्क्यांहून अधिकने घसरण्याची ही कोरोना नंतरही पहिलीच वेळ. तर निफ्टीतही ५ टक्क्यांहून अधिक घट झाली. बाजारात लोअर सर्किटची शक्यता बनत आहे. अशातच बाजार नियामक सेबीने काही काळासाठी ट्रेडिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जेव्हा बाजारात लोअर सर्किट येतो तेव्हा असे होते.

बाजार नियामक सेबीने वेळ जाहीर केली आहे. यात बाजारात ट्र्रेडिं कधी थांबवली जाईल हे सांगण्यात आले आहे. या दरम्यान, शेअरची खरेदी विक्री होणार नाही. म्हजेच आज ४ जूनला जर लोअर सर्किट लागला तर बाजारात २ वेळा ट्रेडिंग हॉल्ट केले जाईल. जर आज वेळेच्या एक तास आधी मार्केट बंद केले जाणार आहे.

कधी-कधी होणार नाही ट्रेडिंग

शेअर बाजारात आज तीन वेळा ट्रेडिंग बंद केले जाईल. यात तिसऱ्यांदा मार्केट बंद केले जाईल. सेबीच्या टायमिंगनुसार पहिले १० टक्के लोअर सर्किट लागल्यानंतर दुपारी १ वाजता बाजारात ट्रेडिंग बंद होईल. त्यानंतर १.४५ ला ट्रेडिंग सुरू होईल. यानंतर लोअर सर्किट लागले तर २ ते २.३० दरम्यान पुन्हा १५ मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद होईल.

दोनदा ट्रेडिंग रोखल्यानंतर अखेर आज बाजार एक तास आधी बंद केला जाईल. मात्र जर तिसऱ्यांदा लोअर सर्किट लागला तर हे होईल. गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी हे केले जात आहे. सेबीनुसार ४ जूनला २.३० वाजल्यानंतर बाजारात ट्रेडिंग होणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -