मुंबई: एक दिवस आधी शानदार वेग घेतल्यानंतर आज मंगळवारी लोकसभा निवडणूक २०२४च्या मतमोजणीच्या दिवशी मात्र बाजार चांगलाच कोसळला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कौलानंतर बाजार चांगलाच कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे मात्र चांगलेच नुकसान झाले आहे.सुरूवातीच्या सत्रात गुंतवणूकदारांना ११ लाख कोटीहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे.
असा विखुरला बाजार
आज सकाळी बाजाराची सुरूवात मोठ्या नुकसानासह झाली. सेन्सेक्स उघडताच १ हजार अंकांनी कोसळला. जसजसे लोकसभा निवडणुकीचे कौल हाती येत आहेत तसतसा शेअर बाजार कोसळत गेला. सकाळी ९.५५ ला सेन्सेक्स १५०० अंकांनी घसरला होता.
गुंतवणूकदारांचे इतके नुकसान
या मोठ्या घसरणीचा परिणाम बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या व्हॅल्यूवरही झाला. बीएसई लिस्टेट कंपन्यांच्या बाजारातील पूंजीकरण कमी होऊन ४११.५१ लाख कोटी रूपयांवर आला. सोमवारी बाजाराने जबरदस्त उसळी घेतली होती. निफ्टी तसेच सेन्सेक्समध्ये ऐतिहासिक वाढ झाली होती. सेन्सेक्स २,५०७.४७ अंकांनी वाढ होत तो ७६,४६८.७८ अंकांवर बंद झाला होता. यावेळी सेन्सेक्सने ७६,७३८,८९ अकांचे नवे शिखर गाठले होते.
बाजाराचे कोसळणे हे लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कौलाचा परिणाम आहे. सुरूवातीच्या कौलामध्ये भाजपचे अनेक उमेदवार पिछाडीवर असल्या कारणाने याचा बाजाराव परिणाम झाला आहे.