Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीSharad Pawar : भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी बारामतीचा पैलवान दिल्लीला जाणार

Sharad Pawar : भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी बारामतीचा पैलवान दिल्लीला जाणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) कल आता स्पष्ट झाले असून देशात भाजपा प्रणित एनडीए सरकार येणार (३०० जागा) हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मात्र इंडिया आघाडीच्या (India Alliance) २२९ जागा येण्याची शक्यता आहे. अर्थात एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणारच आहे. मात्र, भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी पाडापाडीच्या राजकारणात मुरलेल्या शरद पवारांनी हालचाली वाढवल्या आहेत. दस्तुरखूद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनीच माध्यमांशी संवाद साधला याबाबत सुतोवाच केले. यावेळी बोलतांना त्यांनी आतापर्यंतचा कल हा परिवर्तनाला पोषक असून देशातील जनतेने धर्मांध आणि जातीपातीचे राजकारण नाकारले आहे. तसेच, आम्ही २५० जागांच्याही पुढे जाऊ, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, मी नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांना फोन केलेला नाही. मी आज फक्त इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सिताराम येचुरींसह अन्य लोकांशी चर्चा केली. उद्या आमची बैठक होण्याची शक्यता आहे. आम्ही एकत्रित राहू. उद्याच्या दिल्लीला होणा-या बैठकीत आम्ही पुढील धोरणं ठरवू, असेही पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचा आतापर्यंतच कल परिवर्तनाला पोषक आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही दहा जागा लढल्या. मात्र, सात जागांवर आम्ही आघाडीवर आहोत. हे आमच्या एकट्याचे य़श नाही, तर हे महाविकास आघाडीचे यश आहे. आमच्यासोबत आमच्या मित्रपक्षांनीही यश मिळवले आहे. हे सगळं यश काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि आमच्या कार्यकर्त्याचे आहे, असे पवार म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये फारच वेगळा निकाल लागला आहे. या निकालाचे एक वैशिष्ट असे की, यापूर्वी भाजपला युपीमध्ये जे यश मिळायचे, त्याची मार्जिन फार असायची. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला फारच मर्यादित जागा मिळत असल्याचे पवार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -