वाराणसी : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच वाराणसीतून सुरुवातीला धक्कादायक मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर अखेरीस मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मिळवला आहे.मतमोजणीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १,५२,५१३ मतांनी काँग्रेस सपा युतीचे उमेदवार अजय राय यांना हरवले आहे.
वाराणसीतील ही जागा सर्वात चर्चित सीट आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा या ठिकाणाहून निवडून आले आहेत. काँग्रेस युतीचे अजय राय यांच्याशिवाय बसपाचे अतहर जमाल लारी मैदानात होते. त्याशिवाय वाराणसीतून ६ आणखी उमेदवार मैदानात होते.
२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबरदस्त विजय मिळवला होता. २०१४च्या लोकसभआ निवडणुकीत अजय राय तिसऱ्या स्थानावर होते. तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल २०.३० टक्के मते मिळवत दुसऱ्या स्थानावर होते. पंतप्रधान मोदींनी तेव्हा ३.७० लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.