लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचा विजय, आईला उचलून घेत नितेश राणेंनी व्यक्त केला आनंद
June 4, 2024 04:15 PM
मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत(loksabha election 2024) रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे. राणे यांच्या विजयानंतर त्यांच्या मतदारसंघातून जोरदार जल्लोष सुरू आहे.
या विजयानंतर नारायण राणे यांच्या कुटुबियांनी जल्लोष व्यक्त केला. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या आईला उचलून घेत आनंद व्यक्त केला. यावेळी नितेश राणेंनी आईला आनंदाची मिठीही मारली.
पाहा व्हिडिओ
नारायण राणे यांच्याविरोधात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत यांनी निवडणूक लढवली होती. राऊत यांचा पराभव करण्यात नारायण राणेंना यश मिळाले. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनीही यावेळी सभा घेतली होती. कणकवलीत नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी सभा घेतली होती.