Wednesday, July 2, 2025

MP Loksabha result : मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सर्व जागांवर आघाडी!

MP Loksabha result : मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सर्व जागांवर आघाडी!

पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता


भोपाळ : लोकसभा निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीए व इंडिया आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. मतमोजणीमध्ये सध्या एनडीएच आघाडीवर आहे. त्यात मध्यप्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे.


मध्य प्रदेशमध्ये २९ जागा असून या सर्व जागांवर भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे येथे पूर्ण बहुमत भाजपाला मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.


वाराणसीत नरेंद्र मोदींनी १ लाख ३४ हजार १२८ मतांनी आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसचे अजय राय ४० हजार मतांनी आणि बहुजन समाज पक्षाचे अथेर लारी जवळपास १ लाख २० मतांनी मागे आहेत.

Comments
Add Comment