Saturday, July 5, 2025

Mahayuti : कोकणात महायुतीच आघाडीवर! नारायण राणे आणि सुनील तटकरे मारणार बाजी

Mahayuti : कोकणात महायुतीच आघाडीवर! नारायण राणे आणि सुनील तटकरे मारणार बाजी

काय आहे कोकणातील परिस्थिती?


सिंधुदुर्ग : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे जनतेची व राजकीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक फेरीगणिक नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच कोकणातून नारायण राणे आणि सुनील तटकरे यांनी तिस-या फेरीअखेर देखील आघाडी कायम राखली आहे.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे १८ हजार मतांनी आघाडीवर आहेत तर मविआचे विनायक राऊत मागे पडले आहेत. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून अकराव्या फेरीअखेर सुनील तटकरे ३८,७०० मतांनी पुढे आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >