रायबरेली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून तब्बल ३ लाख ९० हजार मतांनी जिंकून आले आहेत.
यंदाची निवडणूक ही राहुल गांधीच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती. यावेळचा विजय हा राहुल गांधींसाठी खास आहे. गांधी कुटुंबातील तिसरी पिढी म्हणून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते आणि संपूर्ण देशाची नजर रायबरेलीच्या निकालावर होती. तर काँग्रेसचा गड जिंकता न आल्याने भाजपच्या गोटात मात्र नाराजी आहे.
यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात देशातील इतर पक्ष एकत्र झाले होते. या निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी देशभरात यात्रा काढली होती.
दरम्यान, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. राहुल गांधीच्या रायबरेली मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह उभे होते.