Wednesday, May 21, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Lok Sabha Election 2024: केरळमध्ये पहिल्यांदा कमळ फुलले , BJPने रचला इतिहास

Lok Sabha Election 2024: केरळमध्ये पहिल्यांदा कमळ फुलले , BJPने रचला इतिहास

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४ची मतमोजणी अखेरच्या टप्प्यात आली आहे. मतमोजणीच्या आकड्याने मात्र साऱ्याच पक्षांना हैराण केले आहे. यातच भाजपचे उमेदरवा सुरेश गोपी यांनी केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. यासोबतच इतिहासात पहिल्यांदा भाजपने केरळमध्ये आपले खाते खोलले आहे. या निवडणुकीत सुरेश गोपी यांनी आपले प्रतिस्पर्धी सीपीआयचे के व्ही एस सुनील कुमार यांना ७४,६८९ मतांनी हरवले.


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश गोपी ४ लाख १२ हजार ३३८ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे उमेदवार के व्ही एस सुनील कुमार यांना ३ लाख ३७ हजार ६५२ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे के मुरलीधरन होते. त्यांना ३,२८,१२४ मते मिळाली.



२०२१मध्ये विधानसभा निवडणुकीत झाला होता सुरेश गोपी यांचा पराभव


त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीआधी सुरेश गोपी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यानंतर २०२१च्या राज्य विधानसभा निवडणुकीत हरले होते.

Comments
Add Comment