नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांनुसार भाजपाप्रणित एनडीएने मोठी झेप घेतल्याचे दिसत आहे. तर इंडिया आघाडी पिछाडीवर आहे.
एनडीए आघाडी ४०० जागा जिंकेल असा दावा भाजपाने केलेला आहे, तर तिकडे आम्ही २९५ पेक्षा अधिक जागा जिंकत असून आम्ही सरकार बनवत आहोत असा प्रतिदावा इंडिया आघाडीच्याही नेत्यांनी केला आहे. यामुळे भाजपाप्रणित एनडीए आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होणार की इंडिया आघाडीला बहुमताचा आकडा मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे ४८ हजार मतांनी आघाडीवर तर सुनेत्रा पवार पिछाडीवर.
रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे ४२ हजार मतांनी आघाडीवर.
सातार्यात भाजपाचे उदयनराजे भोसले पहिल्यांदाच आघाडीवर. ७ हजार मतांनी साधली आघाडी.
कोल्हापुरात काँग्रेसेचे शाहू महाराज ३८ हजार मतांनी आघाडीवर.
सातारा येथे शशिकांत शिंदे ५ हजार मतांनी आघाडीवर.
भिवंडीमध्ये मविआचे सुरेश म्हात्रे १५ हजार मतांनी पुढे आहेत.
शिरुरमधून अमोल कोल्हे ५४ हजार मतांनी आघाडीवर.
कल्याणमधून श्रीकांत शिंदे ८५ हजार मतांनी आघाडीवर.
रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे १८ हजार मतांनी पुढे.
धाराशिवमध्ये मविआचे ओमराजे निंबाळकर १ लाख ४ हजार मतांनी पुढे आहेत.
बीडमध्ये पंकजा मुंडे ९ हजार मतांनी आघाडीवर.
रायबरेलीतून स्मृती इराणी ३७ हजार मतांनी मागे आहेत. तर, काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल आघाडीवर आहेत.
भाजपाचे करण भूषण सिंग हे केसरगंज या मतदारसंघातून उभे आहेत. ते १ लाख ६७ हजार ८३० मतांनी आघाडीवर असून त्यांच्या पाठोपाठ भगत पाल आहेत.
माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील १४ हजार मतांनी आघाडीवर.
जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ ७४ हजार मतांनी आघाडीवर.
हिंगोलीत मविआचे नागेश पाटील आष्टेकर ६ हजार मतांनी पुढे.
नाशिकमधून मविआचे राजाभाऊ वाजे ७१ हजार मतांनी पुढे.
वायनाडमधून राहुल गांधी १ लाख मतांनी आघाडीवर.
दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई ६ हजार मतांनी पुढे आहेत.
नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण ९ हजार मतांनी आघाडीवर.
मथुरेतून ९९,१९६ मतांनी हेमामालिनी आघाडीवर.
मंडीमधून ३६ हजार मतांनी कंगना रनौत आघाडीवर.
अमरावतीत नवनीत राणा १५०० मतांनी आघाडीवर.
रायगड सातवी फेरी २२,९०० मतांनी सुनील तटकरे पुढे
पुण्यात मुरलीधर मोहोळ ११ हजार मतांनी आघाडीवर.
बीडमधून पंकजा मुंडे १ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या रविंद्र वायकर यांची ५ हजार मतांनी आघाडी.
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आणि एनडीए आघाडीत रस्सीखेच सुरु आहे.
मावळमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे ८ हजार मतांनी पुढे आहेत, तर मविआचे संजोग वाघेरे मागे आहेत.
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा २४ हजार मतांनी पुढे.
चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून भाजपाचे पीयूष गोयल २७ हजार मतांनी पुढे.
वायनाडमधून राहुल गांधी ६५ हजार मतांनी पुढे तर रायबरेलीमधून ते १९ हजार मतांनी पुढे आहेत.
ठाण्यातून नरेश म्हस्के १९ हजार मतांनी पुढे आहेत.
सोलापूरमधून प्रणिती शिंदे ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
गांंधीनगरमधून अमित शाह यांनी १ लाख ५५ हजार मतांनी आघाडी मिळवत मोठी झेप घेतली आहे.
उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्जल निकम हे ११ हजार मतांनी पुढे आहेत. तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या पिछाडीवर आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये दुस-या फेरीची मतमोजणी सुरु, आत्तापर्यंत अपक्ष उमेदवार विशाल पाटील २४ हजार मतांनी आघाडीवर
ठाणे लोकसभा – नरेश मस्के आघाडीवर 3824
उस्मानाबाद लोकसभा -महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आघाडीवर
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ -पहिल्या फेरी अखेर सत्यजित पाटील सरूडकर आघाडीवर
कल्याण लोकसभा मतदारसंघ- डॉ. श्रीकांत शिंदे 2 हजार 93 मतांनी आघाडीवर
नांदेड लोकसभा मतदारसंघ – पहिल्या फेरीत 1153 मतांनी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: दुस-या फेरीमध्ये विनायक राऊत 900 मतांनी आघाडीवर
नाशिक लोकसभा मतदारसंघ – महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे २० हजार मतांनी आघाडीवर
रायगड लोकसभा मतदारसंघ दुसऱ्या फेरी अखेर सुनील तटकरे 5 हजार 400 मतांनी आघाडीवर
डोंबिवली विधानसभा मतदार संघातील पहिल्या फेरीत डॉ श्रीकांत शिंदे यांना 5131 तर वैशाली दरेकर यांना 1873 मते मिळाली असून श्रीकांत शिंदे यांची पहिल्या फेरीत 3257 मतांची आघाडी
शेअर मार्केटमध्ये जबरदस्त घसरण; अदानी समूहाच्या शेअरमध्ये दाणादाण; निफ्टी 750, सेन्सेक्स 2,400 अंकांनी घसरला!