Thursday, July 18, 2024
Homeदेशतिसऱ्या कार्यकाळात देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे...

तिसऱ्या कार्यकाळात देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विश्वास व्यक्त

नवी दिल्ली : आमचे विरोधक एकत्र येत इतक्या जागा जिंकू शकल्या नाहीत, ज्या भाजपाने एकट्याने जिंकल्या आहेत. मी देशातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना सांगतो, नागरिकांना सांगतो, तुमची मेहनत ही मोदींना निरंतर काम करण्याची प्रेरणा देते. आपण सगळे मिळून पुढे जाऊ, देशाला पुढे घेऊन जाऊ. तिसऱ्या कार्यकाळात देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार आहे. ही मोदींची गॅरंटी आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मोदी भाजपाच्या मुख्य कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, मी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे अभिनंदन करतो. प्रत्येकाच्या सक्रीय सहभागाशिवाय ही निवडणूक प्रक्रिया शक्य नाही. या जनादेशाचे अनेक पैलू आहेत. १९६२ नंतर पहिल्यांदाच एखादे सरकार त्यांचा २ कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा पुन्हा आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी विधानसभेचे निकाल लागले तिथे एनडीएला स्पष्ट विजय मिळाला. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम या राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. डिपॉझिट वाचवणंही त्यांना कठीण झालं असा टोला मोदींनी लगावला. तसेच तुमच्या या प्रेमासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. आज पुन्हा एनडीएची सलग तिसऱ्यांदा सरकार बनणं निश्चित आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत. देशवासियांनी भाजपावर,एनडीएवर पूर्ण विश्वास दाखवला. आजचा विजय देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. सबका साथ, सबका विश्वास या मंत्राचा विजय आहे. १४० कोटी जनतेचा विश्वासाचा विजय आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

तसेच ओडिशात लोकसभा निवडणुकीत भाजपानं चांगली कामगिरी केली. तिथे भाजपाचं सरकार बनणार आहे. तिथे पहिल्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री बनणार आहे. भाजपानं केरळातही जागा मिळवली. केरळच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलंय. अनेक पिढ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. अनेक पिढी ज्या क्षणाची वाट पाहिली आज ते यश मिळालं आहे. तेलंगणात आपली संख्या दुप्पट झाली. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाने क्लीन स्वीप मिळवलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशात चंदाबाबू नायडू आणि बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली. १० वर्षापूर्वी देशात बदल हवा होता म्हणून जनतेनं आपल्याला कौल दिला. त्यावेळी देशात नैराश्य होते. अशावेळी देशाने आपल्याला जबाबदारी दिली होती. आपण पूर्ण प्रामाणिकपणे काम केले, २०१९ ला याच प्रयत्नांवर विश्वास ठेवत देशाने पुन्हा दुसऱ्यांदा बहुमत दिले. २०२४ ला पुन्हा जो आशीर्वाद एनडीएला मिळाला आहे. त्याबद्दल जनतेसमोर मी विनम्रतेने नतमस्तक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार

एनडीएचा विजय निश्चित झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. देशातील जनतेने एनडीएवर सलग तिसऱ्यांदा आपला विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासामध्ये हा अभूतपूर्व क्षण आहे. मी हे प्रेम आणि आशीर्वादासाठी माझ्या परिवारजनांना नमन करतो. मी देशवासियांना हा विश्वास देऊ इच्छितो की, त्यांच्या आशा आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आम्ही नवी ऊर्जा, नवी उमेद आणि नव्या संकल्पांसह पुढे जाणार आहोत.

या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ज्या समर्पण भावनेने अथक मेहनत केली आहे, मी त्यासाठी त्यांचे आभार मानतो. तसेच त्यांचं अभिनंदन करतो, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर पंतप्रधान माेदींनी ट्विट करत देशवासियांचे आभार मानले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -