मुंबई: आपण अनेकदा ऐकतो की शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. शरीर नेहमी हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. शरीर हायड्रेट राहिल्यास विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र हे खरे आहे का की खूप सारे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. खरंतर, पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
पाणी प्यायल्याने कॅलरीज वेगाने बर्न होण्यास मदत होते. महिलांनी दिवसभरात १३-१४ कप आणि पुरूषांनी १८-२० कप पाणी प्यायले पाहिजे. वजन कमी करायचे असेल तर योग्य पद्धतीने पाणी प्या.
वजन कमी करायचे असेल तर नेहमी जेवणाआधी अर्धा तास आधी आणि जेवल्यानंतर २ तासांनी पाणी प्या. पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते. अशा स्थितीत तुम्ही जास्त खाणे करत नाहीत. जेव्हा तुम्ही मर्यादेमध्ये खाता तेव्हा वजन वाढण्याची जोखीम कमी होते.
डिटॉक्स वॉटर प्या
डिटॉक्स वॉटर फळे अथवा भाज्यांनी बनवलेले असते. वजन कमी करण्यात डिटॉक्स वॉटर महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही हे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात.