मुंबई : आज लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) निकाल लागणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची सुरुवात झाली आहे. मतमोजणीबाबत सतत अपडेट मिळत असताना कोण बाजी मारणार हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या राजकीय पक्षांच्या चिन्हांची मिठाई तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या धुराळ्यात ही मिठाई वेगळंच (Special Mithai) आकर्षण ठरत आहे.
मिठाईच्या अनेक दुकानात राजकीय पक्षांच्या चिन्हांची मिठाई प्रदर्शित केली जात आहे.
भाजपा पक्षाच्या कमळ चिन्हाची मिठाई तयार करण्यात आली आहे.
तर कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हाचीही मिठाई ग्राहकांना आकर्षित करत आहे.