Friday, July 11, 2025

Price Hike : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! गृहपयोगी वस्तूंवर महागाईचा भडका

Price Hike : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! गृहपयोगी वस्तूंवर महागाईचा भडका

मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असून प्रत्येकाला मान्सूनची (Monsoon) आतुरता लागली आहे. काही दिवसात महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचे आगमन होणार आहे. मात्र नागरिकांना अजूनही उन्हाच्या कडाक्याला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पाणीटंचाईच्या (Water Shortage) समस्यांचा सामना करावा लागत असताना नागरिकांची चिंता वाढवणारी मोठी माहिती समोर येत आहे. सध्या बाजारात जीवनावश्यक गोष्टींचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात इनपुट खर्च वाढल्यामुळे इतर वस्तूंवरील खर्च वाढत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या तिमाहीत तांबे आणि ॲल्युमिनिअमच्या किंमती वाढल्या होत्या. परिणामी नागरिकांना लागणाऱ्या गृहपयोगी वस्तूंच्या दरातही ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होत आहे.



'या' गोष्टींचे वाढले दर


इनपुट खर्च वाढल्यामुळे तांदूळ, डाळ त्यासोबत पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. तसेच रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यासह अन्य इलेक्ट्रिक वस्तूंवरील किंमतींमध्ये २ ते ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. सतत महागाईचा भडका उडत असल्याने सर्वसामान्यांची चिंता आणखी वाढू लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा