Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीNew Delhi Loksabha : नवी दिल्लीमध्ये भाजपाची जादू! आप आणि काँग्रेस पिछाडीवर

New Delhi Loksabha : नवी दिल्लीमध्ये भाजपाची जादू! आप आणि काँग्रेस पिछाडीवर

जामिनावर सुटलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या प्रचाराचा प्रभाव पडला कमी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले असतानाच मिनिटामिनिटाला मतांची आकडेवारी बदलत आहे. त्यातच आता नवी दिल्लीतून (New Delhi) आप (AAP) आणि काँग्रेस (Congress) मागे पडले असल्याचे चित्र आहे, तर भाजपाने (BJP) या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे. नवी दिल्लीसोबतच भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि नवी दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी एकतर्फी पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीमध्ये (New Delhi) आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी जामिनावर बाहेर येऊन प्रचार केल्यानंतरही आप आणि काँग्रेसला फायदा होताना दिसत नाही. भाजपने नवी दिल्लीतील सातही जागांवर आघाडी घेतली आहे.

नवी दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

  • चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण खंडेलवाल हे काँग्रेसच्या जय प्रकाश अग्रवाल यांच्यापेक्षा पुढे आहेत.
  • उत्तर पूर्व दिल्लीत मनोज तिवारी आणि कन्हैय्या कुमार यांच्यात लढत होती. इथं मनोज तिवारी आघाडीवर आहेत.
  • दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपचे हर्ष मल्होत्रा आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमार लढत होते.
  • नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या बांसुरु स्वराज आघाडीवर असून त्यांच्याविरोधात लढत असलेले सोमनाथ भारती पिछाडीवर आहेत.
  • उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपचे योगेंद्र चंदोलिया आणि काँग्रेसचे उदित राज यांच्यात लढत होती. इथं योगेंद्र चंदोलिया आघाडीवर आहेत.
  • पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कमलजीत सेहरावत यांनी आघाडी घेतली आहे. इथं आम आदमी पार्टीचे महाबल मिश्रा यांच्यात लढत होती.

लोकसभेसाठी मतदारांचा भाजपाला पाठिंबा

नवी दिल्लीतील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळी देखील दिल्लीच्या मतदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीतून दिसून येत आहे. मद्य धोरण प्रकरणी अटकेच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवत प्रचार केला होता. मात्र, नवी दिल्लीत पुन्हा एकदा भाजपने वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -