Saturday, June 29, 2024
Homeताज्या घडामोडीAmit shah: गांधीनगरमधून अमित शाह यांचा बंपर विजय, ७ लाख मताधिक्याने हरवले

Amit shah: गांधीनगरमधून अमित शाह यांचा बंपर विजय, ७ लाख मताधिक्याने हरवले

गांधीनगर: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा लोकसभा निवडणूक २०२४मध्ये प्रचंड बहुमताने विजय झाला आहे. अमित शाह यांनी गांधीनगरल लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

निवडणुकीचे यंदाचे निकाल भले भाजपा आणि एनडीएनुसार राहिलेले नाहीत. मात्र गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून अमित शाह यांनी कमाल केली आहे. या जागेवरून अमित शाह यांनी आपलाच जुना रेकॉर्ड मोडीत काढत ७,४४७,१६ मतांनी विजय मिळवला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी या जागेवरून ५ लाख मतांनी विजय मिळवला होता. याआधी गांधीनगर मतदारसंघातून अडवाणी यांनी ४.८३ लाख मतांनी विजय मिळवला होता.

गेल्या ३५ वर्षांपासून गांधीनगर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. अमित शाह यांच्याआधी या जागेवरून लालकृष्ण अडवाणी निवडणूक लढवत होते. त्यामुळे ही जागा भाजपसाठी अतिशय सुरक्षित मानली जात होती. अडवाणी या जागेवरून ६ वेळा निवडणूक जिंकले आहेत. २०१९ पासून अमित शाह या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. अमित शाह यांनी गांधीनगर येथून दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवला आहे.

अमित शाह यांच्याविरोधात गांधीनगर मतदारसंघातून काँग्रेंसचे उमेदवार सोनल पटेल उभे होते. गांधीनगर मतदारसंघातून अमित शाह मोठ्या विजयाच्या दिशेने जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -