Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीअनंत गितेंच्या पराभवानंतर उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

अनंत गितेंच्या पराभवानंतर उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

म्हसळा : म्हसळा नगरपंचायतीमधील शिवसेना उबाठाच्या एकमेव सदस्या, नगरसेविका राखी करंबे यांनी उबाठा पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांचे पती अजय करंबे यांनीही शिवसेना उबाठा युवा सेनेच्या शहर अधिकारी पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

आ. भरत गोगावले आणि आ. थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील चांदोरकर आणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कोणत्याही निर्णयात सामील करून घेत नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे राखी करंबे यांनी सांगितले. वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ती योग्य प्रकारे पार पडणार असल्याचे राखी करंबे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -