मुंबई: रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांच्या शानदार ओपनिंगनंतर वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीच्या वेगवान गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानने टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) पदार्पण करणाऱ्या युगांडावर तब्बल १२५ धावांनी विजय मिळवला.
कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीचा फलंदाज गुरबाज आणि त्याचा जोडीदार जादरानने पुरुषांच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दुसरी सर्वात मोठी १५४ धावांची भागीदारी केली. यामुळे अफगाणिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८३ इतकी धावसंख्या गाठता आली.
Fabulous Farooqi 💫
The Afghanistan opening bowler takes home the @aramco POTM after he returned excellent figures of 5/9 🏅#T20WorldCup #AFGvUGA pic.twitter.com/34JqOMtlGe
— ICC (@ICC) June 4, 2024
यानंतर युगांडा हे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरला. मात्र वेगवान गोलंदाज फारूकीने पहिल्यांदा पाच विकेट घेत युगांडाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यानंतर संपूर्ण संघ १६ षटकांत ५८ धावांवर ऑलआऊट झाला.