Monday, May 19, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Piyush Goyal : उत्तर-मुंबईत पियुष गोयल यांचा दणदणीत विजय

Piyush Goyal : उत्तर-मुंबईत पियुष गोयल यांचा दणदणीत विजय

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतितटीची लढत सुरू असताना उत्तर-मुंबईचा (North Mumbai) गड भाजपच्या पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सर केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील (Bhushan Patil) यांचा दारुण पराभव केला.


मुंबईतील लोकसभेची जागा उत्तर मुंबई ही भाजपासाठी २००४ आणि २००९चा अपवाद वगळता सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. १९८९ पासून लागोपाठ भाजपने उत्तर मुंबईचा गड राखला आहे. मात्र यावेळी भाजपकडून दोन वेळा खासदार राहिलेला गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.


जातीय समीकरण, भाषेचा मुद्दा, भूमिपुत्रांचा मुद्दा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अवतीभोवती मुंबईतील सहाही लोकसभा जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. या मतदारसंघात देखील मराठी - अमराठी किंवा बाहेरून आलेला उमेदवार अशा प्रकारचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला गेला.


मात्र विरोधकांच्या प्रचाराच्या सर्व मुद्द्यांना मागे सारत भाजपचा गेल्या कित्येक वर्षांपासून बालेकिल्ला असलेला हा गड गोयल यांनी कायम राखला आहे.

Comments
Add Comment