
नवी दिल्ली: दिल्लीच्या सरिता विहार पोलीस स्टेशनजवळ सोमवारी ताज एक्सप्रेसच्या ३ डब्यांना आग लागली. १२२८० ताज एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. उत्तर रेल्वेच्या माहितीनुसार तुगलकाबाद-ओखला यांच्यात ताज एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. दरम्यान, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
डीसीपी रेल्वेच्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे एकूण ६ बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीला जखम अथवा नुकसान झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना मेहनत करावी लागली.
ताज एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जूनला ट्रेनला आग लागण्यासंदर्भात संध्याकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास पीसीआरला कॉल मिळाला. यावेळी ताज एक्सप्रेसच्या तीन डब्यांना आग लागली होती. दरम्यान, हे वृत्त समजताच ट्रेन थांबवण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नाही. कारण प्रवासी दुसऱ्या डब्यात गेले आणि उतरले. रेल्वेकडून पुढील कारवाई केली जात आहे.