
मुंबई: गेल्या आठवड्यात २ टक्क्यांनी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर मार्केटचा मूड सुधारणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर त्याचे अनुकूल परिणाम दिसत आहेत. याच्यामुळे बाजारात चांगली घोडदौड होणार असल्याची शक्यता आहे. सोमवारी बाजार सुरू होण्याआधीच याचे संकेत मिळाले.
बनू शकतो नवा इतिहास
सोमवारी ३ जूनला बाजार सुरू होण्याआधीच निफ्टीच्या वायद्याने जबरदस्त उड्डाण केले होते. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये निफ्टीचा वायदा सकाळी ६५० अंकांनी मजबूत होता. गिफ्ट निफ्टीने ६४७ अंकांनी वाढ घेत ते २३,३३५ अंकांवर होता. बाजार सुरू होोण्याआधीच जर बाजार इतक्या मोठ्या संख्येने उघडत असेल तर शेअर बाजाराच्या इतिहासात आज सगळ्यात मोठा रेकॉर्ड बनू शकतो.
याआधी शुक्रवारी ३१ मेला बीएसई सेन्सेक्स ७५ अंकांनी सुधारत ७३,९६१.३१ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी ४२ अंकांनी मजबूत होत २२,५३०.७० अंकांवर होती. े